पुणे – पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे आज सकाळी करोनामुळे निधन झाले. ते ४२ वर्षाचे होते. वेळेत उपचार न मिळाल्याने पांडुरंग यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वृत्तामुळे पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पांडुरंग रायकर यांना काही दिवसांपूर्वीच थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाली. त्यांनी करोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 28 ऑगस्ट रोजी पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या मूळगावी गेले. मात्र तिथेही त्यांना त्रास सुरू होत असलयाने त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारांसाठी कोपरगावमध्येच रूग्णालयात दाखल होण्यासाठी त्यांनी चौकशी केली. या रुग्णालयाने (नाव समजू शकले नाही) त्यांना ४० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. पण खर्च जास्त असल्याने त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथे नुकत्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ते उपचारासाठी दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू झाले. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.
मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी ७८ पर्यंत खाली गेल्याने त्यांना जम्बो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक अॅम्बुलन्सची गरज होती. अशी अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री एक अॅम्ब्युलन्स मिळाली. पण, त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या आणखी एका अॅम्बुलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे ५ वाजता अॅम्ब्युलन्स उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचे निधन झाल्याचे सांगितले. याच्या थोड्याच वेळात कार्डिॲक अॅम्ब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
Pune: Journalist Pandurang Raykar, who tested COVID19 positive, dies; family alleges lack of care at govt COVID centre
“There’s chaos, doctors aren’t trained. They made centres worth crores but couldn’t arrange cardiac ambulance to shift him, that’s why he died,” says his sister pic.twitter.com/LAHhBfC1Sm
— ANI (@ANI) September 2, 2020
दरम्यान, मागील सहा महिन्यांत पांडुरंग रायकर यांनी करोनाच्या असंख्य बातम्या केल्या. त्यामध्ये सीईओपी मैदानावर जम्बो कोविड सेंटर सुरू होणार या बातमीचादेखील समावेश आहे. त्यांना आज त्याच उभारलेल्या रुग्णालयात मृत्यूला सामोरे जाण्याची वेळी आली. एक पत्रकारच ढिसाळ व्यवस्थेचा बळी ठरला असल्याची चर्चा आहे.