पत्रकार नीरव मोदीला पकडण्यात यशस्वी; मोदी सरकारला का अशक्य? : काँग्रेस

नवी दिल्ली –भारताचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या नीरव मोदी बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदी सध्या लंडनमधील वेस्ट एंड भागात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरामात राहत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. नीरव मोदी भारताचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आरामात राहत असून त्याने तिथे हिऱ्यांच्या नवा व्यवसाय देखील सुरू केल्याची बातमी माध्यमांमध्ये येताच काँग्रेसद्वारे मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसने निरव मोदीबाबत ट्विटद्वारे भाजप सरकारला जाब विचारला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ‘पत्रकार नीरव मोदीला पकडण्यात यशस्वी झाले. मात्र मोदी सरकारसाठी निरव मोदीला पकडणे का अशक्य ठरत आहे? मोदी नक्की कुणाची रक्षा करत आहेत? स्वतःची, नीरव मोदीची, की त्याला पळण्यास मदत करणाऱ्या लोकांची? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.