पारनेर, – महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. विशेषतः समता प्रस्थापित करणे व प्राथमिक स्त्रीशिक्षण याबाबींमुळे त्यांच्या कार्यास अधिक झळाळी मिळाली. एकूणच समतेचा महान पुरस्कर्ता व शिक्षणमहर्षी म्हणजे महात्मा जोतीराव फुले अशी ओळख त्यांची संपूर्ण जगभर झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ. कुंदा कवडे यांनी केले.
पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले पुण्यतिथी म.फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. अर्जुन चाटे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा. स्वाती फापाळे यांनी केले तर प्रा.विशाल रोकडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. अमोल नालकर, डेअरी डिप्लोमा प्राचार्य प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा. संजय जाधव, प्रा. विशाल रोकडे, प्रा.दत्तात्रय शेळके, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. शिवाजी शेळके, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा.सचिन बलसाने, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. सुप्रिया पारखे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांता थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. मोहन माने, कार्यालय अधीक्षक गोरख घोलप, लेखापाल सूर्यमाला भोर, सुनिता भालेराव, विकास सोनवणे, रवींद्र वाघ, पांडुरंग शिरोळे, शिवाजी कळंबे आदी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.