#IPL2021 : हेझलवूडच्या माघारीने सीएसकेला धक्‍का

चेन्नई -चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएल स्पर्धा केवळ एका आठवड्यावर आलेली असताना ऑस्ट्रेलियाच्या जोस हेझलवूडने माघार घेतल्याने धक्‍का बसला आहे.

आयपीएलच्या 14 व्या मोसमाला येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाला आता हेझलवूडच्या माघारीने मोठा फटका बसणार आहे. येत्या सप्टेंबर व ऑक्‍टोबर या कालावधीत भारतात होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक तसेच त्यानंतरच्या ऍशेस मालिकेसाठी सज्ज राहण्यासाठी हेझलवूडने माघार घेतली आहे.

जर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत काही दुखापत झाली तर त्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही व सध्या तरी हा धोका पत्करण्याची तयारी नाही, असे हेझलवूडने सांगितले आहे. तसेच आयपीएलच्या बायोबबलपासून दूर राहून कुटुंबीयांना वेळ देणेही शक्‍य होणार असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.

विविध स्पर्धांसाठीचे बायोबबल तसेच त्या स्पर्धांपूर्वीचे विलगीकरण हेझलवूडसह अनेक खेळाडूंना जड जात असल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे, असेही हेझलवूडने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.