Jonty Rhodes-Gautam Gambhir :- भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अजून मजबूत होणार आहे. त्यांनी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाची साथ सोडली व कोलकाता संघामध्ये गेले, त्यावेळी त्यांनी सोडलेला प्रभाव आम्ही अनुभवाला आहे. त्यामुळेच गंभीर यांच्याकडे कोणत्याही संघावर छाप सोडण्याची क्षमता आहे, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने बोलताना व्यक्त केला.
भारताचा माजी सलामीवीर असलेल्या गौतम गंभीर यांची बीबीसीआयने भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या विषयावर बोलताना जॉन्टी रोड्स म्हणाला. गौतम गंभीरला नक्की काय हवे आहे, याची त्याला पूर्ण कलपना आहे. त्याच्या मनात असलेल्या गोष्टी तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असतो. भारतीय संघाचे प्रशिक्षकपदी त्याची नियुक्ती करण्यात आल्याने भारतीय संघ अजून समर्थपणे पुढे जाईल, असे रोड्स बोलताना म्हणाला.
लखनौ सुपर जायंट्स संघाने नुकतेच भारताचा वेगवान गोलंदाज असलेल्या जाहीर खानची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीवर देखील रोड्सने भाष्य करताना म्हणाला की, आयपीएल मधील टी-२० क्रिकेट हे वेगवान असले तरी ते अतिशय शांत डोक्याने खेळणे गरजेचे आहे. अनेकदा सामन्यादरम्यान तणाव निर्माण होतो, त्यावेळी डग-आउटमध्ये झहीर खान सारखा शांत स्वभावाचा माणूस तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतो.
झहीर खान तुमच्यासोबत असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार आहे. त्याच्याकडे असलेल्या कौशल्य आणि अनुभवाचा वापर करून त्याने दिलेला सल्ला महत्वाचा ठरतो, असे देखील रोड्स म्हणाला.
तो निर्णय देखील माझा नाही…
रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होणार असल्याच्या अनेक अफवा पसरत आहेत. यावर बोलताना जॉन्टी रोड्स म्हणाला, रोहित व मी मुंबई संघात एकत्र होतो, तो तांत्रिकदृष्ट्या अतिशय उजवा खेळाडू आहे. सध्या सुरु असलेल्या अनेक गोष्टीमुळे, तो लखनौ संघामध्ये येणार आहे की नाही, याची मला कल्पना नाही, आणि तो निर्णय देखील माझा नाही, असे जॉन्टी रोड्सने सांगितले.