दुबई – दुसरा चूक करेपर्यंत शांत राहणे व त्यानंतर अचानक डाव पालटणे हा धोनीचा सर्वांत मोठा गुण आहे, असे सांगताना धोनीला चक्क कोब्रा नागाची उपमा दिल्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व समालोचक डीन जोन्स सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.
काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला याने दाढी वाढविली होती, त्यावेळी तो अतिरेक्यासारखा दिसतो, अशी टिप्पणी केल्याने जोन्स यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघाचे अत्यंत कल्पकतेने नेतृत्व केले.
धोनी हा कोब्रा नागासारखा आहे. तो समोरच्या खेळाडूकडून चूक होण्याची वाट पाहतो व त्याच्याकडून चूक झाली की मग कोब्रासारखा पटकन प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करतो, असे जोन्स यांनी म्हटले होते. त्यावर जोन्स यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. एखाद्या खेळाडूचे कौतुक करताना आपण कोणती उपमा द्यावी हेदेखील कळत नसेल तर उपमा देऊ नका, अशा शब्दांत जोन्स यांना धोनीच्या प्रशंसकांनी फटकारले आहे.