बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो कायम सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतो. यावेळी तो हॉलीवूड चित्रपटांमधील खलनायक “जोकर’मुळे चर्चेत आहे. त्याने जोकरच्या लूकमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून आयुषमान आता खलनायकाच्या भूमिकेत झळकणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
माझ्याकडे काही योजना असेल असं तुम्हाला वाटतं का? मी काय आहे? मी असा का आहे? गाड्यांचा पाठलाग करणारा मी एक कुत्रा आहे. मला माहित नाही मला काय करायचंय. कारण मी अराजकता पसरवणारा व्यक्ती आहे. अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली आहे.
मला जोकर सारखी एखादी थक्क करणारी व्यक्तिरेखा साकारायची आहे, असेही आयुषमान या कॉमेंटमध्ये म्हणाला. आयुषमानचा हा जोकर अवतार सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, जोकर ही एक खलनायक व्यक्तिरेखा आहे. साली बॅटमॅन कॉमिक्ससाठी या व्यक्तिरेखेची निर्मिती करण्यात आली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेला हा खलनायक प्रेक्षकांना प्रचंड आवडला