राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद

मुंबई – राज्यात आज सकाळपासूनच राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘अजित पवार’ यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला असून, राज्यपाल ‘भगतसिंह कोश्यारी’ यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यातील काही ठळक मुद्दे…

गैरसमजातून गेलेल्या आमदारांवर कारवाई नाही; शरद पवारांचे स्पष्टीकरण

आमदारांना कोणतीही कल्पना न देता राजभवनावर नेण्यात आले – शरद पवार

सुप्रिया सुळेंचे नाव राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी नव्हते; शरद पवारांची माहिती

अजित पवार फुटून जातील असे कधी वाटले नव्हते. – शरद पवार

अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल – शरद पवार

केंद्रातील नेत्यांनी जे केलं त्याचा सूड आम्ही घेऊ – ठाकरे

आमची लढाई भाजपच्या ‘मी’पणाविरोधात आहे – उद्धव ठाकरे

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघेही एकत्र आहेत आणि एकत्रच राहणार – शरद पवार

भाजपला स्पष्ट बहुमत सिद्ध करता येणार नाही.

आम्ही शरद पवारांसोबत; राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर यांनी सांगितला राजभवनावरील संपूर्ण घडामोड.

१० ते ११ सदस्य अजित पवारांसोबत : शरद पवारांची माहिती

जे गेलेत आणि जाणार असतील त्यांच्यावर पक्षांतराची कारवाई होणार – शरद पवार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)