लोकसेवा आयोगातर्फे “क’ गटाच्या पदांसाठी संयुक्‍त पूर्वपरीक्षा

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये घेतलेल्या गट-क सेवा मुख्य परीक्षेतील कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदाचा निकाल अद्यापही जाहीर झाला नाही. परंतु, आयोगाने “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा 2019′ जाहीर केली आहे. त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांतील 264 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा दि. 16 जूनला राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना सहा मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागातील दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क गट-क) 33 पदे, वित्त विभागातील कर सहायक – 126 पदे, सामान्य प्रशासन विभागातील लिपिक-टंकलेखन (मराठी)-68 पदे आणि लिपिक -टंकलेखक (इंग्रजी) या 7 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. दरम्यान, संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेचा कालावधीही जाहीर झाला आहे.

परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षेचा दिनांक : 16 जून
मुख्य परीक्षा संयुक्‍त पेपर क्रमांक 1 : 6 ऑक्‍टोबर
मुख्य परीक्षा संयुक्‍त पेपर क्रमांक 2 (लिपिक) :13 ऑक्‍टोबर
मुख्य परीक्षा संयुक्‍त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक) : 20 ऑक्‍टोबर
मुख्य परीक्षा संयुक्‍त पेपर क्रमांक 2 (कर सहायक) : 3 नोव्हेंबर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.