राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा; मनसेच्या भोजपुरी बॅनरची चर्चा

मुंबई – परप्रांतीयांविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नरमाई दाखवली आहे. मनसेने आता मुंबईतील उत्तर भारतीयांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील एका बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. या बॅनरमुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

मसनेच्या वर्धापन दिनानिमित्त 14 मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा एकदा सुरुवात करणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेकॉर्डेड संदेशमध्ये सांगितले होते. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या या मंगलकार्यात सर्वांना सामावून घ्या, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले होते. या पार्श्वभूमीवर कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत बॅनर्सच्या लावत उत्तर भारतीय मतदारांना मनसेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.

काय लिहिले आहे बॅनरवर?

जय श्री राम …हिंदुत्व के सम्मान में उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, महाराष्ट्र की उन्नति और हिंदुत्व की बुलंद आवाज…हर हिन्दू की लड़ाई लड़ने वाले योद्धा आपन हिन्दू जननायक श्री राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा, हमहू ई अभियान से जुडल बा, आप लोगन से बिनती करात बा, आप लोग भी ई मंगल अभियान से जुड़ जाई, और पूरे महाराष्ट्र के भगवा रंग में बदल देइ…, असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, घाटकोपर परिसरात नागरिकांना पक्षात सामील होण्याचे आव्हान करण्यासाठी मनसेने गुजराती भाषेत बॅनर्स लावले होते. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.