बॉलीवूडमधील ऍक्शन हिरो जॉन अब्राहमचे करियर सध्या खूपच चांगले सुरू आहे. गेल्या काही चित्रपटांमध्ये त्याने सोलो हिरोची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धम्माल करत चांगली कमाई केली होती. या चित्रपटांमुळे जॉनकडे पुन्हा बिग बजेट चित्रपटांची रांग लागली आहे. जॉन अब्राहम सध्या “सत्यमेव जयते-2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटाची लखनौमध्ये शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर जॉन पुढील वर्षाच्या सुरुवातीला बिग बजेट असलेल्या “पठाण’चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने तब्बल 20 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. जॉनने काही निवडक बिग बजेट चित्रपटांसाठीच एवढे मानधन घेतलेले आहे. मात्र, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप अधिकृतने पुष्टी दिलेली नाही.
दरम्यान, “पठाण’मध्ये जॉनसह शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणही मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातून किंग खान प्रदीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करत आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सद्वारा प्रोड्यूस करण्यात येणार आहे. या चित्रपटाची शाहरुखच्या चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात जॉन आणि शाहरुख यांच्यातील ऍक्शन पाहण्याची चाहत्यांना संधी मिळणार आहे.