रेसलिंगच्या जगातील बादशाह म्हणून ओळखला जाणारा जॉन सीना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याने अलीकडे पुन्हा एक फोटो शेअर केले आहे. हा फोटो बॉलीवूडमधील खिलजी अर्थात रणवीर सिंहचा आहे. जरी हा फोटो लोकांनी यापूर्वी पाहिला असेल, परंतु या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
जॉन सीना हा सोशल मीडिया कायम सक्रिय असतो. अलीकडेच त्याने रणवीर सिंहचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. परंतु हा फोटो फोटोशॉप करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले- “स्टोन कोल्ड सिंग’.
ही पोस्ट पाहिल्यानंतर रणवीर सिंह त्यावर भाष्य करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. पोस्ट पाहून त्याने “हाहा’ अशी प्रतिक्रिया दिली. जॉनने रणवीरचा फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही जॉनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा “83′ हा चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे या चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे.