जॉन अब्राहमच्या “बाटला हाऊस’चा टीझर रिलीज

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याच्या आगामी “बाटला हाऊस’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 2008मध्ये दिल्लीतील बाटला हाउसमध्ये झालेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. या टिझरमध्ये त्याची दमदार झलक दिसते.

या टिझरची सुरुवात व्हॉईस रिकॉर्डिंगने होते, त्यानंतर गोळीबार होत असल्याचे दिसते. या गोळीबारात जॉनची झलक दिसते आणि त्यानंतर “स्टॉप’वर कोणी तरी ओरडत असल्याचा आवाज होतो. पुढे जॉन अब्राहम काही प्रश्‍न विचारताना दिसतो. त्या दिवशी बाटला हाउसमध्ये काय झाले?, का आम्ही चुकीचे होतो?, माझी काय चुक होती का? असा प्रश्‍नांचा तो भडीमार करतो. याचवेळी स्क्रीनवर “साल 2008 में कुछ गन शॉट्‌स ने कई कहानियां बना दीं। 11 साल बाद हम लाए हैं असली कहानी’। अशी अक्षरे दिसून येतात.

हा टिझर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत जॉन पोस्ट करतो की, त्या दिवशी झालेल्या गोळीबारीचा आवाज 11 वर्षानंतरही कायम आहे. याची खरी कहानी समजण्यासाठी पहा बाटला हाऊस…’

दरम्यान, “बाटला हाऊस’चे शूटिंग फेब्रुवारीतच पूर्ण झाले होते. या चित्रपटात जॉन अब्राहम हा डीसीपी संजीव कुमार यादव नामक भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.