13 ऑगस्टला जॉन अब्राहम करणार “अटॅक’

मुंबई – बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याचा “अटॅक’ हा ऍक्‍शन चित्रपट अनाउंसमेंट झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात जॉनने अनेक जबरदस्त ऍक्‍शन सीन दिले आहेत. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

जॉनने एक ट्‌वीट करत या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत माहिती दिली. जॉन अब्राहमचा हा चित्रपट स्वतंत्रता दिवसानिमित्त 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

जॉन अब्राहमने लिहिले की, “अटॅक’, एक ऍक्‍शनने भरपूर आणि जबरदस्त कथा असलेला चित्रपट मला खूपच आवडला आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात जॉनसह अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह लीड रोल साकारत आहेत.

हा चित्रपट लक्ष्य राज आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट जॉन अब्राहमने पॅन इंडिया स्टूडियोज आणि अजय कपूरसह को-प्रोड्यूस केला आहे. यात जॉन अब्राहम हा एका बाइक रेसरची भूमिका साकारत आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जॉनकडे सध्या बॅक टू बॅक चित्रपट आहेत. तो “अटॅक’शिवाय “सत्यमेव जयते-2’मध्येही झळकणार आहे. याशिवाय तो “एक व्हिलेन-2’मध्येही मुख्य भूमिका साकारत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.