पुन्हा झळकणार जॉन-अभिषेकची जोडी

बॉलीवूड अभिनेता-निर्माता जॉन अब्राहम याने गतवर्षी “अय्यप्पनमम कोशियुम’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे राइटस्‌ घेतले होते. जॉनने हे राइटस्‌ घेतल्यानंतर या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये कोणती जोडी झळकणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

चाहत्यांची ही उत्सुकता आता संपली असून “दोस्ताना’मधील जोडी जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन या चित्रपटातून पुन्हा एकत्रित येणार आहेत. “अय्यप्पनम कोशियुम’च्या रिमेक कोलेबरेट करण्यासाठी या दोन्ही कलाकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या दोघांनीही होकार दर्शविला असून ते लवकरच काम सुरू करणार आहेत.

2008मध्ये “दोस्ताना’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील जॉन आणि अभिषेक यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती. यानंतर ही जोडी कोलेबरेट करण्यासाठी अनेक परियोजना आखण्यात आल्या होता. परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत. तसेच “दोस्ताना-2’मध्ये दोघे एकत्रित काम करणार होते. परंतु त्याची पटकथा त्यांना आवडली नाही. दरम्यान, “अय्यप्पनमम कोशियुम’ हा एक हिट चित्रपट असून तो 2020मध्ये लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी प्रदिर्शत करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा एका प्रभावशाली आणि गर्भश्रीमंत असलेला माजी पोलीस अधिकारी अय्यप्पन नायर (बीजू मेनन) आणि सुभेदार कोशी कुरियन (पृथ्वीराज) यांच्या संघर्षावर आधारित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.