जोहान बोथाची क्रिकेटमधून निवृत्ती

होबार्ट -दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जोहान बोथाने अचानक सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बोथाचा ऑस्ट्रेलिया टी- 20 क्रिकेट लीगमधील संघ होबार्ट हॅरिकेन यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

यामध्ये सांगण्यात आले आहे की, वाढते वय आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकवता येत नसल्याने बोथाने हा निर्णय घेतला आहे. 36 वर्षीय बोथाला 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघासाठी 78 एकदिवसीय सामने, 40 टी- 20 सामने 5 कसोटी सामने खेळले आहेत तर 10 सामन्यात कर्णधारपदही भूषवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2009 मध्ये त्याच्याच कर्णधार पदाच्या काळात एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4-1 असे नमवत जागतिक क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)