जॉगिंग पार्कचा वापर खेळासाठीच व्हावा

महापौरांना निवेदन : सावेडीतील 1778 नागरिकांची मागणी, खेळाडूंची गैरसोय

नगर  – महापालिकेने महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ऍक्‍ट अन्वये एखादी मिळकत ज्या कारणाकरिता आरक्षित केली आहे, त्याच कारणाकरीता मिळकतीचा वापर करणे आवश्‍यक असतांना महानगरपालिका बेकायदेशीरित्या सदर सावेडीतील जॉगिंग पार्क भाड्याने देऊन सदर जागेचा वापर हा व्यापारीकरणाकरिता करत असून, सदरचे कृत्य हे बेकादेशीर आहे, अशा तक्रारीचे नागरिकांच्या 1778 सह्यांचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक मनोज दुलम, भैय्या गंधे, उदय कराळे, सतीश शिंदे, विलास ताठे, प्रतिक बारसे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे सावेडी येथील नगररचना योजना क्र.4 फायनल प्लॉट न.268 वरील आरक्षण क्र.31 सावेडी जॉगिंग पार्क या मिळकतीबाबत सह्या करणारे हे सावेडी उपनगर व त्या परिसरातील राहणारे नागरिक असून आमच्या स्वत:ची घरे त्याच परिसरात आहेत. महानगरपालिकेने मिळकतीचे आरक्षण करतांना आरक्षण क्र. नुसार शहरातील अनेक ठिकाणी प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी मिळकती आरक्षीत केलेल्या आहेत. सदर मिळकती आरक्षीत करण्याचा मूळ उद्देश हा शहरातील नागरिकांना जॉगिंग पार्क उपलब्द व्हावेत तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध व्हावीत याच उद्देशाने सदर आरक्षणे करण्यात आलेली आहेत.

नगर शहराचा दैनंदिन होणारा विकास पाहता अनेक शाळांना खेळासाठी मैदाने उपलब्ध नाहीत त्याचप्रमाणे तरूण, वृद्ध, स्त्रिया,मुली यांना फिरण्यासाठी व व्यायामासाठी पुरेशी जागा नसल्याने महानगरपालिकेने सावेडी उपनगरासाठी सावेडी जॉगिंग पार्क खेळाचे मैदान यासाठी आरक्षीत केलेला आहे. त्याचप्रमाणे सदर आरक्षण करतांना त्या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी व्यायामासाठी अगर खेळासाठी तेवढेच एकमेव मैदान उपलब्ध आहे याची जाणीव असल्याने वेळोवेळी महानगरपालीकेने मोठ्या प्रमाणात खर्च करून मैदानाच्या सभोवती फिरण्यासाठी ट्रॅक त्याचप्रमाणे मैदानाचे लेवलिंगची कामे वेळोवेळी करण्यात आलेली आहेत व खर्चही त्याच कारणासाठी महापालिकेने दाखवलेला आहे. सदर मैदान हे पूर्णपणे सुरक्षीत राहावे म्हणून मैदानाच्या सर्व बाजूला साडे पाच फुटी वॉल कंपाऊंड तसेच सदरच्या मैदानावर कोणतेही अतिक्रमण होवू नये व मैदानाचे नुकसान होवू नये म्हणून दोन्ही बाजूला गेट करण्यात आलेली आहे.

या वरून महानगरपालीकेचा मुळ उद्देश हा फक्त खेळासाठी केला जावा हा असल्याने सदर जागेवर समर्थ विद्या मंदिर प्रशाळा या शाळेची मुले मुली उपनगरातील बहुतांशी नागरिक हे सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत व्यायामासाठी, फिरण्यासाठी सदर जागेचा वापर करीत आलेले आहेत. महानगरपालीकेने महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ऍक्‍ट अन्वये एखादी मिळकत ज्या कारणाकरिता आरक्षित केली आहे, त्याच कारणाकरीता मिळकतीचा वापर करणे आवश्‍यक असतांना महानगरपालिका बेकायदेशीरित्या सदर सावेडीतील जॉगिंग पार्क भाड्याने देऊन सदर जागेचा वापर हा व्यापारीकरणाकरिता करत असल्याचे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)