जो बायडन यांच्या नव्या टीममध्ये 20 पेक्षा जास्त भारतीय वंशांचे सदस्य

मुंबई : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या हाती सत्तेचे सर्व सूत्र घेतल्यानंतर काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलासाठी त्यांनी आपली ट्रान्झिशन टीम देखील तयार केली आहे. या टीममध्ये 20 हून भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थान देण्यात आले आहे. यापैकी तीन भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक एजन्सी रिव्ह्यू टीमचे नेतृत्त्व करतील. ही टीम सत्तेचे हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी सद्य प्रशासनातल्या प्रमुख फेडरल एजन्सींच्या कामकाजाचा आढावा घेईल.

भारतीय वंशाचे हे सदस्य अमेरिकेतील व्यवस्थेत मोठे बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अमेरिकेत नवे राष्ट्रपती आपल्या एजन्सी रिव्ह्यू टीम अर्थात आर्ट बनवतात, जेणेकरुन शपथविधीनंतर तातडीने काम सुरु करता येईल. बायडन यांच्या हस्तांतरण टीमने म्हटले, “अध्यक्ष हस्तांतरण टीमच्या इतिहासात ही टीम सर्वात विविधता असेलली आहे.” अमेरिकेत सत्ता हस्तांतरणासाठी बनवलेल्या एजन्सी रिव्ह्यू टीममध्ये शेकडो सदस्य आहेत, ज्यात महिलांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. 40 टक्के सदस्य अशा समाजातील आहेत ज्याचे सरकारमधील प्रतिनिधित्व कमी आहे. यात कृष्णवर्णीय, एलजीबीटी, दिव्यांगांचा समावेश आहे.

अरुण मजुमदार, अतमन त्रिवेदी, अनिश चोप्रा, राहुल गुप्ता, अरुण वेंकटरमण, राज डे, किरण अहुजा, सीमा नंदा, राज नायक, सुभाश्री रामनाथन, शीतल शाह, आर रमेश, रामा झाकिर, रीना अग्रवाल, सत्यम खन्ना, भव्या लाल, दिलप्रीत सिद्धू, दिव्य कुमारियाह, कुमार चंद्रण, पुनीत तलवार, पाव सिंह या भारतीय वंशाचा नागरिकांचा जो बायडन यांच्या टीममध्ये समावेश आहे. बायडन आणि कमला हॅरिस यांना सहजरित्या काम करता यावं यासाठी सदस्य काम करतील. अमेरिकेत राहणारे भारतीय हे सामान्य: डेमोक्रॅटिक पक्षाचे पारंपरिक मतदार समजले जातात. विशेष म्हणजे 24 भारतीय वंशांच्या लोकांनीच जो बायडन आणि कमला हॅरिस यांना 18 कोटी रुपयांची देणगी दिली होती. आर्टमध्ये सर्व सदस्यांचा स्वयंसेवक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

सत्ता हस्तांतरण टीममधील भारतीय

राहुल गुप्ता – राष्ट्रीय औषध नियंत्रण धोरण
किरण अहुजा – कर्मचारी व्यवस्थापन
पुनीत तलवार – परराष्ट्र विभाग
पाव सिंह – राष्ट्रीय सुरक्षा परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान
अरुण वेंकटरमण – वाणिज्य आणि यूएसटीआर
प्रवीण राघवन, आत्मन त्रिवेदी – वाणिज्य विभाग
शीतल शाह – शिक्षण विभाग
आर रमेश, रामा झाकिर – ऊर्जा विभाग
शुभश्री रामनाथन – अंतर्गत सुरक्षा विभाग
राज डे – न्याय विभाग
सीमा नंदा, राज नायक – कामगार विभाग
रीना अग्रवाल, सत्यम खन्ना – फेडरल रिझर्व आणि बँकिंग आणि सिक्युरिटीज नियामक व्यवहार
भव्या लाल – नासा
दिलप्रीत सिद्धू – राष्ट्रीय सुरक्षा परिषद
दिव्य कुमारियाह – व्यवस्थापन आणि बजेट कार्यालय
कुमार चंद्रण – कृषी विभाग
अनिश चोप्रा – टपाल सेवा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.