वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. 78 वर्षीय जो बायडेन करोनाच्या हाय रिस्क गटातील आहेत. सध्या, बायडेन यांना करोना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे.
नवनिर्वाचित अध्यक्षांना लाईव्ह टेलिव्हिजनवर लस देण्यात आली. यावेळी बायडेन यांनी वैज्ञानिक, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सर्वांचे आभार मानले. त्यांना फायझरने विकसित केलेल्या लसचा एक डोस दिला. फायझरच्या लसीला अमेरिकेत अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी डेलावेअरच्या क्रिस्टियाना केअर हॉस्पिटलमधील एका परिचारिकाने फायझर आणि बायोनोटॅक यांनी विकसित केलेल्या लसचा पहिला डोस बायडेन यांना दिला. लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर लस डोस घेतला.
या दरम्यान, बायडेन म्हणाले, ‘काळजी करण्याची काहीच कारण नाही. आता ही लस उपलब्ध आहे आणि मी तुम्हा सर्वांना लस घेण्यास आग्रह करत आहे. अमेरिकेत जानेवारीपासून करोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात बायडेन यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी करोना साथीच्या रोगाचा बचाव करण्यासाठी केलेले अथक कार्य आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्ही सर्वांचे आभारी आहोत’.
लसीकरण थेट दाखविण्यासाठीमागे अमेरिकेतील लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी असे करण्यात आले आहे. बायडेन म्हणाले, ‘आम्हाला नागरिकांना सांगायचे आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आता घाबरायचे काही नाही.’