इस्लामाबाद – अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता गेले काही दिवस होती. अखेर जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
जो बायडेन यांच्या विजयावर पाकिस्तान फारच खूश दिसत आहे. कारण, ट्रम्प यांनी दहशतवादाबद्दल सार्वजनिक मंचांमध्ये वारंवार पाकिस्तानला फटकारलं आहे. त्यामुळे बायडेन यांच्या विजयामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची पाकिस्तानला अपेक्षा आहे.
इम्रानने बायडेन आणि हॅरिसचे केले अभिनंदन
Congratulations @JoeBiden & @KamalaHarris. Look forward to President Elect Biden’s Global Summit on Democracy & working with him to end illegal tax havens & stealth of nation’s wealth by corrupt ldrs. We will also continue to work with US for peace in Afghanistan & in the region
— Imran Khan (@ImranKhanPTI) November 7, 2020
बायडेन यांच्या विजयाबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन करताना अमेरिके सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे, “जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे विजयाबद्दल अभिनंदन. आशा आहे की, लोकशाहीविषयी ग्लोबल समिट आणि बेकायदेशीर कर चोरी संपविण्यासाठी आणि भ्रष्ट मार्गाने देशाच्या संपत्तीच्या व्यवहारात समावेश असलेल्या लोकांवर आळा घालण्यासाठी आपण एकत्र काम करू. आम्ही अफगाणिस्तान व अन्य भागात अमेरिके समवेत शांततेसाठी आपले काम करत राहू. ‘
दोन्ही देशात चांगल्या संबंधाची अपेक्षा – नवाज शरीफ
Congratulations @JoeBiden on a historic victory for you, the American people and democracy. We look forward to better ties between the US and Pakistan under your leadership.
— Nawaz Sharif (@NawazSharifMNS) November 7, 2020
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही जो बायडेन यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. “जो बायडेन आणि अमेरिकन नागरिकांचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन. आम्ही तुमच्या नेतृत्वात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात आणखी चांगल्या संबंधाची अपेक्षा करतो”.