वॉशिंग्टन – टाइम मॅगझीनने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना वर्ष 2020 साठी “पर्सन ऑफ द इयर’ घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांच्या निकालानंतर ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
एएफपीच्या अहवालानुसार डेमोक्रेटिक पक्षाचे बायडेन आणि कमला हॅरिस यांना टाईम “पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून निवडले असल्याची माहिती दिली. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हातीदेखील उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले होते. तर 2016मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला होता.
टाईम मॅगझीनने बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या फोटोंचा एक कव्हर फोटो तयार केला आहे. मॅगझीनच्या फोटोंसोबतच त्यांनी “चेंजिंग अमेरिका स्टोरी’ असा मथळा दिला आहे. तसेच अमेरिकेची कहाणी बदलण्यासाठी, मतभेदाऐवजी सहानुभूतीला अधिक ताकद असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि कठिण काळातून पुढे जात असलेल्या जगाला एक दृष्टी देण्यासाठी, असे टाईम मॅगझीनने लिहिले आहे.
दरम्यान, 78 वर्षीय जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये 306 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ 203 मते मिळाली होती.