ज्यो बायडेन प्रशासनाचे भारताशी कनेक्‍शन; 20 भारतीयांची ‘व्हाइट हाउस’मधील प्रमुख पदांवर नियुक्ती

वॉशिंग्टन – येत्या 20 तारखेला म्हणजे उद्याच ज्यो बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची तर कमला हरिस उपाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारणार आहेत. अमेरिकेत भारतीयांचा गेल्या काही काळात दबदबा वाढला आहे. तेथील प्रशासनात भारतीयांची प्रमुख पदांवर वर्णी लागली आहे. बायडेन यांच्या कार्यकाळात कोणत्या भारतीयांकडे कोणत्या जबाबदाऱ्या असणार आहेत, ते पाहणे रंजक ठरेल.

मुळात बायडेन यांनी सूत्रे हाती घेण्याच्या अगोदर 20 भारतीय वंशाच्या नागरिकांची प्रमुख पदांवर नियुक्ती अगोदरच केलेली आहे. यातील 17 जण तर थेट व्हाइट हाउसमध्ये कार्यरत असणार आहेत. व्हाइट हाउस हे अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे. जगाची सूत्रे येथून हलतात असे म्हटले तरी त्यात काही वावगे ठरणार आहे.

अशा या शक्तीस्थळीच भारतीय वंशाचे 20 जण कार्यरत असणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडत असावे. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन शपथ घेतील. त्यांच्यासोबत कमला हरिस याही शपथ घेणार आहेत. कमलाही भारतीय वंशाच्या आहेत व विशेष म्हणजे अमेरिकेच्या त्या पहिला अश्‍वेत उपाध्यक्ष आहेत.

बायडेन यांनी प्रमुख पदांवर बऱ्याच जणांची नियुक्ती केली असली तरी अजुन काही जागा रिक्त आहेत. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या केवळ 1 टक्के भारतीय तेथे राहतात, त्यातही 17 जणांना बायडेन यांनी व्हाइट हाउसमध्ये स्थान दिल्याने त्यांची ही कृती लक्षणीय ठरली आहे. 20 भारतीयांपैकी 13 महिला असून त्यांनी प्रशासनात महत्वाचे स्थान पटकावले आहे.

बायडेन प्रशसनात सगळ्यात पहिले नाव घेतले जाणार आहे ते नीरा टंडन आणि डॉ. विवेक मूर्ती यांचे. व्हाइट हाउसमध्ये व्यवस्थापन आणि बजेटच्या संदर्भात महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या शिवाय मूर्ती यांना अमेरिकेचे सर्जन जनरल म्हणूनही नामांकन देण्यात आले आहे.

याशिवाय गरिमा वर्मा आणि सबरिना सिंह यांनाही बायडेन प्रशासनात सहभागी करून घेण्यात आले आहे. गरिमा यांना अमेरिकेच्या प्रथम महिलेच्या कार्यालयाच्या डिजिटल संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर सबरीना यांना प्रसार माध्यम विभागाच्या उपमंत्री करण्यात आले आहे.

मूळच्या काश्‍मीरच्या असलेल्या आयशा शहा आणि व्याप्त काश्‍मीरशी संबंधित समीरा फाजली यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. भारतीय वंशाचे राममूती आणि गौतम राघवन यांनी उपसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अनुक्रमे व्हाइट हाउस आणि कार्मिक विभागात जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय वेदांत पटेल यांच्या सहायक माध्यम मंत्र्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. बायडेन यांच्या भाषण विभागाचे संचालक म्हणून द. भारतातील विनय रेड्डी काम पाहतील. उद्योग आणि राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून तरूण छाबडा काम पाहणार आहेत तर सुमोना गुहा दक्षिण आशियाच्या वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत असणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.