Jobs In Canada । कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निवडणुका जवळ आल्याने अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ट्रूडो यांनी कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या परदेशींची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कमी पगारावर काम करणाऱ्या आणि देशात तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या लाखो परदेशी लोकांवर परिणाम होणार आहे, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
कॅनडामध्ये शिकण्यासाठी जाणारे भारतीय विद्यार्थी महागाईमुळे अभ्यासाच्या व्यतिरिक्त छोट्या नोकऱ्या करून पैसे कमावतात. जस्टिन ट्रूडोच्या या निर्णयामुळे स्थलांतरित आणि तरुणांमध्ये बेरोजगारी वाढेल, असे निवडणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रुडोने लिहिले की श्रमिक बाजार बदलला आहे. याविषयी लिहिताना “आम्ही कॅनडामधील कमी वेतनावर असलेल्या तात्पुरत्या परदेशी कामगारांची संख्या कमी करणार आहोत. आता आमच्या व्यवसायांसाठी कॅनेडियन कामगार आणि तरुणांमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांकडून ट्रुडोच्या या निर्णयाला राजकारणाशी जोडले जात आहे. या निर्णयामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या संख्येने युझर्स त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अनेक कॅनेडियन सोशलमिडीयावर आपल्या भावना व्यक्त करत असून ट्रुडो आतापर्यंतचे सर्वात वाईट पंतप्रधान म्हटले आहे.
कोरोनानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट Jobs In Canada ।
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कोरोना महामारीनंतर कामगारांच्या मोठ्या तुटवड्यामुळे ट्रूडो सरकारने निर्बंधांमध्ये दिलासा दिला होता. यानंतर, कमी पगार असलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. आता कॅनडा इमिग्रेशन व्यवस्थेतील बदलांची चर्चा करत आहे. कायमस्वरूपी रहिवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे या आठवड्यात कॅबिनेट स्ट्रीटमध्ये या विषयावर चर्चा होऊ शकते.
‘या’ ठिकाणी मदत मिळेल Jobs In Canada ।
आज, सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी बेरोजगारीचा दर सहा टक्के किंवा त्याहून अधिक आहे अशा ठिकाणी कमी पगाराच्या परदेशी कामगारांना काम दिले जाणार नाही. तथापि, कृषी, अन्न आणि मत्स्य प्रक्रिया आणि आरोग्य सेवा यासारख्या अन्न सुरक्षा क्षेत्रांमध्ये अजूनही दिलासा आहे, कारण येथे कामगारांची कमतरता आहे.