नवी दिल्ली – तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत एकूण 1033 पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर जाऊन लॉग इन करून उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2022 पर्यंत आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार, एकूण 1033 पदांपैकी DRM कार्यालय, रायपूर विभागासाठी 696 पदे आणि वॅगन रिपेअर शॉप, रायपूरसाठी 337 पदांची भरती केली जाणार आहे. तर, अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी इयत्ता 10 वी परीक्षा किंवा समकक्ष किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा –
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR ने जारी केलेल्या माहितीनुसार, अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत साइटला भेट द्यावी.