#JNU : निदर्शने होत असताना दिल्ली पोलीस झोपले होते का?- रोहित पवार

मुंबई : जेएनयूत रविवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद सगळीकडे उमटले आहेत. मुंबईतील निषेध आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन करायचंच नाही का?, असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना विचारला. निर्दर्शने

कोणत्याही बाहेरील वयक्तीना विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी पास घ्यावा लागतो मग विद्यापीठात गुंड घुसलेच कसे? असा संतप्त सवाल त्यांनी केला. विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना मारहाण करणारे कोण होते? निर्दशने होत असताना दिल्ली पोलीस झोपले होते का?

विद्यार्थी गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते. विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन कराचे नाही का? या घटनेचा आम्ही निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली.

 

 

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.