विष्णू प्रसाद,चिराग घोरपडे चमकले

पहिल्या फेरीत नवोदितांनी वेधले सर्वांचे लक्ष : जेके टायर-एफएमएससीआय नॅशनल रेसिंग स्पर्धा

कोईमतूर – आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणारा भारताचा आघाडीचा चालक विष्णू प्रसाद आणि उदयोन्मुख चिराग घोरपडे हे दोघे जेके टायर एफएमएससीआयच्या नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकले. 22 व्या हंगामाच्या पहिल्या फेरीत वर्चस्व राखतांना या दोघांनी जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सर्वांचे लक्ष वेधले.

सैय्यद मुझामिल अली हा या रॅलीतील दिवसांचा हिरो ठरला आहे. पहिल्या फेरीत जेके टायर सुझूकी गिक्‍सर कपमध्ये वर्चस्व राखत विजय संपादन करतांना जल्लोष केला. या चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरवात हीच मुळात तरूण उदयोन्मुख चालकांच्या कलागुण, कौशल्यांला वाव देणे हा उद्देश आहे. त्यामुळेच 27 चा दिवस हा त्यांच्यासाठी निराशेचा नव्हे तर वैभव प्राप्त करून देणारा ठरला आहे.

नोव्हाईस कपमध्ये बंगळूरच्या चौदा वर्षी चिराग घोरपडे यांनी मोटारस्पोर्टस्‌ प्रकारात खऱ्या अर्थाने पहिला फेरी केवळ गाजवलीच नाही तर आपले विजयी वर्चस्व राखले. चिंरागने 13:37:912 मिनिटे एवढया वेळेची नोंद करत आपला आक्रमक खेळ दाखवला. त्यावेळी 0.338 एवढी नोंद केली. अरोह रविंद्र आणि मोहमंद रियान (मोटारस्पोर्टस्‌) या दोघांनी चिरागला रॅलीच्या अखेरच्या ठिकाणी मागे टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

या चौदावर्षीय चिरागने गती,कौशल्य दाखवत सर्वांचेच लक्ष वेधत आपला वाढदिवसही दिमाखात आणि वेगळ्या स्टाईने दुसरी स्पर्धा जिंकण्यानेच साजरा केला. अरोहला चिरागला मागे टाकण्यात अपयश आले तरी तो दुसऱ्या क्रमाकांचा तर
परीक्षित दर्धीली (डीटीएस रेसिंग) याने रियानला तिसरे स्थान मिळवता आले.

एलजीबी-4 मध्ये नामांकितांमध्ये चुरस

फॉर्म्युला एलजीबी-4 मध्ये सर्वच बाबतीत बोलायचे झाल्यास सात राष्ट्रीय विजेत्यांमध्येच खरा संघर्ष दिसून आला. विष्णू (एमस्पोर्टस),रोहित खन्ना(डार्क डॉन रेसिंग) आणि आश्‍विन(डार्क डॉन रेसिंग) या तिघांच्या तीन मार्गातील प्रवेशांने गाजली. सुरवातीला अश्‍विनने एमस्पोर्टसच्या अव्वल सोहिल शहाला मागे टाकत आघाडी घेण्याची संधी मिळाली. पण ती त्याला टिकवता आली नाही. त्याने अखेरच्या टप्पातही चांगली आघाडी घेतली. सेप्टी कारच्या अगोदरच पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र सोहिलच्या कामगिरीने त्यांला तिसरे स्थान मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.