श्रीनगर : मध्य काश्मिरमधील बडगाम येथून जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असणाऱ्या एकाला अटक केली. विश्वासार्ह खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बडगाममधील खानसाहिब भागात नाकाबंदी करून या व्यक्तीला अटक केली.
साकीब अहमद लोने या वागर खानसाहब येथील रहिवाशाला अटक केली. त्याच्याकडू आक्षेपार्ह सामग्री ताब्यात घेण्यात आली. खानसाहिब भागात तो जैश ए महंमदच्या अतिरेक्यांना सक्रिय मदत असल्याची नोंद त्याच्यावर पोलिस ठाण्यात आहे.
या भागात दहशतवाद्यांना निवारा मिळवून देण्याची व्यवस्था तो करत असे. त्याच बरोबर अन्य स्थानिक माहिती देत असे. त्याच्याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून जप्त केलेल्या आक्षेपार्ह सामग्रीवरून दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले.