“83’मध्ये के. श्रीकांतची भूमिका साकारणार जिवा

बॉलीवूडमधील आगामी बीग बजेट असलेल्या “83′ या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दक्षिण स्टार जीवा साकारणार आहे. यापूर्वी पंजाबी स्टार एमी विर्क याला बलविंदर सिंह संधू यांची भूमिका साकारण्यासाठी निश्‍चित करण्यात आले होते.

के. श्रीकांतची भूमिका साकारण्यासाठी जीवा याने 7 किलो वजन कमी करणार आहे. यासाठी जीवा याने आतापासूनच प्रशिक्षण घेण्यास सुरुवात देखील केली आहे. तसेच के. श्रीकांतची क्रिकेट शैली शिकण्यासाठी जिवा याने “83’च्या विश्‍वचषक स्पर्धेतील व्हिडिओ पाहत आहेत. यातून श्रीकांत कशा प्रकारे फलंदाजी करतो याचे बारकावे शिकत आहे.
या भूमिकेसाठी अभिनेता जिवाला कास्ट करण्याबाबत निर्माता मधु मंटेना म्हणाले, जेव्हा मी माझा आवडता “केओ’ चित्रपट जीवासोबत पाहिला, तेव्हापासूनच मी त्याचा चाहता झालो आहे. तसेच या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवू इच्छित होतो. पण अखेर या चित्रपटातून त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या मते श्रीकांतच्या भूमिकेला तोच योग्य न्याय देऊ शकेल.

दरम्यान, “83’मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारत असून अन्य खेळाडूंच्या कास्टिंगचीही लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×