मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. यावरून आता राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण केलं जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना पवार साहेबाना शारीरिक इजा करायची होती …. महाराष्ट्राचे नशीब असे काही घडले नाही ….’ असं म्हणत असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.