मुंबई – राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी 2 च्या सुमारास ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं,” असेही पवारांनी ट्विट करून म्हटले आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण ईडी कार्यालयावर येणार असल्याचे ट्विट केले आहे, त्यामुळे आव्हाडही आता ईडी कार्यालयात धडकणार आहेत.
माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार…
तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत
कर्क रोग
मांडी च्या हाडाचे ऑपरेशन
पायाला झालेली इजा
तरी तुम्ही लढताय
वय वर्ष 79
हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलय
उद्या साठी माफ करा @PawarSpeaks pic.twitter.com/EvBxyZ3zjR— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019
यांदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. “माफ करा, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्क रोग, मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय, वय वर्ष 79, हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय, उद्या साठी माफ करा”. अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच आव्हाड यांनी या ट्विटमध्ये शरद पवार यांनादेखील टॅग केलं आहे.