“2020मध्ये करोना येणार हे ‘अल्ला’ला 2011मध्येच समजलं; म्हणूनच…” – जितेंद्र आव्हाडांचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. असं असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक अजब विधान केलंय. “करोना संकट येणार हे ‘अल्ला’ला माहिती होतं, त्यामुळे कब्रस्थानसाठी जागा मिळाली आणि ते बांधून पूर्णही झालं” असं आव्हाड म्हंटलेत.
याबाबतचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून यामध्ये आव्हाड मुंब्रा येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिसतायेत. यावेळी ते म्हणतात, “करोनाच्या काळात जर आपल्याकडे हे कब्रस्थान नसते, तर शहराची काय परिस्थिती झाली असती, याची कल्पनाही करवत नाही. याचा विचार अल्लाने आधीच २०११ मध्ये करून ठेवला होता की, २०२० मध्ये करोना येणार आहे. आणि हा करोना येण्यापूर्वी येथे कब्रस्थान बनले पाहिजे, म्हणूनच येथे कब्रस्थानासाठी २०११मध्ये जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थानाचे काम पूर्ण झाले,”
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आव्हाड यांच्या वक्तव्यावर आता प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा