तानाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘जितेंद्र आव्हाड’ झाले संतप्त; ट्विटरवरून दिली धमकी

मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं गेलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच “तानाजी मालुसरे”. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

नुकतंच ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. परंतु, याच ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ट्रेलरमधील काही दृश्यांवर आणि संवादांवर राष्ट्रवादीचे नेते ‘जितेंद्र आव्हाड’ यांनी आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना धमकीच दिली आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल”. असं आव्हाड म्हणाले.

सिनेमात अजय देवगण याच्यासोबतच काजोल आणि अभिनेता सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)