Reliance Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी असून, या कंपनीचे मालक आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी आहेत. तुम्हाला जिओच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन वैधतेसह अनेक रिचार्ज योजना मिळतील.
परंतु, अशी योजना देखील आहे जी तुम्हाला सर्वात कमी किंमतीत जास्तीत जास्त वैधता ऑफर करते. यासोबतच तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला याच प्लानबद्दल सांगणार आहोत.
Jio आपल्या वापरकर्त्यांना विविध किंमती श्रेणींमध्ये अनेक रिचार्ज योजना ऑफर करते, जे विविध फायद्यांसह येतात. हे फायदे डेटा आणि वैधतेनुसार बदलतात.
कमी किमतीत सर्वाधिक वैधता :
Jio चा रिचार्ज प्लॅन 1899 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 336 दिवसांची म्हणजेच 11 महिन्यांची वैधता मिळते. हा प्लान रिचार्ज करून तुम्ही 11 महिन्यांसाठी रिचार्जचा त्रास टाळू शकता. यामध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो, जो तुम्ही इंटरनेट वापरण्यासाठी वापरू शकता.
अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस :
जिओचा हा प्लान अमर्यादित कॉलिंगसह येतो. म्हणजेच भारतातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉलिंग करता येईल.
यासह तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर पाठवण्यासाठी एकूण 3600 एसएमएस मिळतात. याशिवाय तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
‘या’ वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम योजना :
जर तुम्हाला जास्त डेटाची गरज नसेल आणि तुम्ही दीर्घ वैधतेसह परवडणारा जिओ प्लॅन शोधत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. हा प्लान तुम्हाला जिओच्या वेबसाइटवरील व्हॅल्यू सेक्शनमध्ये मिळेल.
रिलायन्सने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. जिओने लोकांना कमी किमतीत इंटरनेट पुरवले. लॉन्च झाल्यानंतर, बहुतेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.