भारताला ‘२ जी’ मुक्त करण्यासाठी जिओ-गुगलची भागीदारी – मुकेश अंबानी

नवी दिल्ली – देशातील आघाडीचे नेटवर्क प्रोव्हायडर असलेल्या ‘जिओ’तर्फे आज काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. याबाबतची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली असून रिलायन्स जिओ व गुगलने  भारताला ‘२ जी’ मुक्त करण्याचा चंग बांधला असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुगलसोबत झालेल्या भागीदारीबाबत बोलताना, “Google आणि Jio एक ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी भागीदारी करीत आहेत. यामुळे एका व्हॅल्यू-इंजिनियर्ड, एंट्री-लेव्हल 4 जी / 5 जी स्मार्टफोन निर्मितीला चालना मिळणार आहे.” असंही ते म्हणाले.

दरम्यान, रिलायन्स जीओसोबत केलेल्या भागीदारीबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी माहिती देताना,  “प्रत्येकाला इंटरनेटचा ऍक्सेस असणे आवश्यक आहे. गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन या फंडातून आम्ही रिलायन्स जिओ सोबत ४.५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करीत आहोत. याद्वारे भारतातील स्मार्टफोन नसलेल्या कोट्यवधी लोकांना इंटरनेट ऍक्सेस देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असं स्पष्ट केलं.

जिओ ५ जी बाबतही घोषणा                                                                                                                       “रिलायन्स जीओने जागतिक दर्जाची ५ जी सुविधा उभारली आहे. ५ जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच याबाबतच्या चाचण्या घेऊन पुढील वर्षापर्यंत ५ जी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल.” अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.