बीजिंग – अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तिबेटमध्ये तब्बल 47.8 अब्ज कोटी डॉलर खर्चून बांधण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवण्याची सूचना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
चीनच्या दक्षिणेकडील सिच्युआन प्रांताला तिबेटमधील लिंझी प्रांताला हा रेल्वे प्रकल्पाद्वारे जोडले जाणर आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेपासून जवळच असलेल्या या भागातील रेल्वेप्रकल्पामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र सीमा भागातील स्थैर्य जपण्यासाठी हा रेल्वे महत्वाची भूमिका बजावेल्, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.
सिच्युआन-तिबेट हा रेल्वे प्रकल्प तिबेटमधील किंनघाय-तिबेट रेल्वे प्रकल्पानंतरचा दुसरा रेल्वे प्रकल्प आहे. हा प्रकल्प भौगोलिकदृष्ट्या जगातील सर्वात सक्रिय असलेल्या दक्षिण-पूर्वेकडील किंनघाय-तिबेटच्या पठारावरून जाणार आहे, असे चीनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सिच्युआन-तिबेट रेल्वेमार्गाची सुरूवात सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदू येथून होते आणि याआन मार्गे कंबो मार्गे तिबेटमध्ये प्रवेश करतो. लिंझी भागाला निंगची देखील म्हटले जाते आणि हा भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ आहे. अरुणाचल प्रदेशला चीनने नेहमीच दक्षिण तिबेट म्हटले आहे. मात्र चीनचा हा दावा ठामपणे फेटाळून लावला आहे.
वेगाने काम सुरू
याआन-लिंझी रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी 1,011 किमी आहे. या प्रकल्पातील रेल्वे ताशी 120 ते 200 किमी वेगाने धावणे अपेक्षित आहे. तर सिच्युआन-तिबेट या संपूर्ण रेल्वे प्रकल्पाचा अंदाजे खर्च 318.8 अब्ज युआन (47.8 अब्ज डॉलर) इतका आहे. या प्रकल्पातील चेंगदू- याआन भागाचे काम डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाले अणि ल्हासा-निंगग्ची भागातील रेल्वेमार्गाच्या कामाला जून 2015 मध्ये सुरूवात झाली आहे.