भारतात ऑफ रोड एसयूव्ही कारला चांगली मागणी आहे. सध्या तरुणाई कारपेक्षा ऑफ रोड एसयूव्हीला जास्त पसंती देत असल्याचे लक्षात आल्याने भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी ऑफ रोड जिम्नीचं 5-डोर व्हेरिएंट लॉंच करण्याची योजना आखत आहे.
खरे तर जिम्नी इतर देशात लॉंच होऊन चार-पाच वर्षे उलटली आहेत. मात्र भारतात अद्यापही जिम्नी लॉंच केली नाही. त्यामुळे जिम्नी भारतात केव्हा लॉंच होणार याची उत्सुकता होती. पुढील वर्षी ही कार भारतीय बाजारात दाखल होईल. मारुतीच्या ही एसयूव्ही 5-डोअर मॉडेल आहे. कारचा व्हीलबेस 2,550 मिमी लांब आणि ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी इतका असेल.
या वाहनाचं कर्ब वेट 1,190 किलो इतकं आहे, जे नियमित 3 डोर मॉडेलपेक्षा 100 किलो जास्त आहे. 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल. या एसयूव्हीमध्ये 48व्ही माइल्ड-हायब्रिड असिस्टन्ससह टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. जे 1.4 लीटरचे बूस्टरजेट इंजिन असू शकतं जे 140पीएस पॉवर आणि 230एनएम टॉर्क जनरेट करेल.