वॉशिंग्टन- आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने समीक्षकांसह चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता जीम कॅरी पुन्हा प्रेक्षकांसमोर येतो आहे. यावेळी तो अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष आणि आताच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
एनबीसीने त्यांच्या सॅटर्डे नाइट लाइव्ह या विडंबनपर शोच्या 46 च्या सीझनची घोषणा केली असून त्यात जीम कॅरी झळकणार आहे. सध्याच्या करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि सर्व खबरदारी घेत याचे चित्रिकरण केले जाणार आहे.
या सीझनमध्ये बायडेन यांच्या भूमिकेसाठी जीम कॅरीची पहिल्यांदाच निवड झाली आहे. गेल्या वेळी अभिनेता जेसन सुडेकीसने ही भूमिका साकारली होती.