सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 रुग्ण तसेच सातारा शहरातील खासगी रुग्णालयांतून 25 जण अशा एकूण 87 जणांना दहा दिवसांनतर बुधवारी घरी सोडण्यात आले. तर 624 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जावळी तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 14, खंडाळा तालुक्यातील 5, कोरेगाव तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 8, पाटण येथील 1, सातारा येथील 16 व वाई तालुक्यातील 7 अशा 62 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून बुधवारी 16 जण करोनामुक्त झाले. या सर्वांचे कृष्णा हॉस्पिटलच्या वतीने स्वागत करण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत एकूण 720 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 36, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 12, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 28, कोरेगाव 45, वाई 100, शिरवळ 83, रायगाव 23,
पानमळेवाडी 35, मायणी 38, महाबळेश्वर 65, पाटण 25, खावली 81 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 53 अशा एकूण 624 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.