मावळात संघटनेची कार्यकारिणी जाहीर
वडगाव मावळ – मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचा आदर्श घेतल्यास मुलींच्या जीवनात बदल होईल. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुलींनीच पुढाकार घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिजाऊंच्या लेकी संघटनेच्या प्रदेश संस्थापक स्नेहल घोटकुले यांनी केले.
जिजाऊंच्या लेकी संघटनेच्या वतीने येथील विशाल लॉन्समध्ये रविवारी (दि. 4) आयोजित रक्तदान शिबिरात 50 दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी मावळ पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले, भाजप महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, अविनाश कारके, डॉ. प्रतीक पलांडे, कुणाल येवले, करण भुजबळ, कुणाल हुलावळे, अश्विनी साठे, सुमित जाधव, रचना विधाटे, सीमा आहेर आदी उपस्थित होते.
यावेळी जिजाऊंच्या लेकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षपदी स्नेहल घोटकुले, मावळ तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – मावळ तालुकाध्यक्षपदी प्रगती भेगडे, उपाध्यक्ष : सुषमा कारके, कार्याध्यक्ष : वैष्णवी येवले, सरचिटणीस : पूजा वायकर.
पवन मावळ अध्यक्ष : आदिती ठाकूर, उपाध्यक्ष : अश्विनी शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुजा ठाकूर, नाणे मावळ अध्यक्ष : अंजली आहेर, उपाध्यक्ष : कोमल वाळुंज, आंदर मावळ अध्यक्ष : कृषी धुमाळ, वडगाव अध्यक्ष : समीक्षा ढोरे, उपाध्यक्ष : मानसी देशमुख, कार्याध्यक्ष : शुभदा दरेकर, सचिव : छाया पवार, सोमाटणे अध्यक्ष : दीपिका साठे, तळेगाव दाभाडे अध्यक्ष : शुभांगी बोरकर.