संयुक्‍तराष्ट्रांच्या हेलिकॉप्टरवर जिहादींचा नायजेरियात हल्ला

 

डकार- नायजेरियातील जिहादींनी संयुक्‍तराष्ट्रांच्या मदत सामग्री पोचवणाऱ्या हेलिकॉप्टरवर हल्ला केला. त्यात दोन जण ठार झाले आहेत. हा हल्ला बोको हराम या इस्लामिक दहशतवाद्यांनी केल्याचा दावा नायजेरीयाचे अध्यक्ष मेहम्मदू बुहारी यांनी केला आहे. या हल्ल्याचे संबंधित संघटनेला मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांवर सरकारी फौजांनी मोठी कारवाई सुरू केल्याने त्यांची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळेच या नैराशातून त्यांनी आता निरपराध नागरिकांना लक्ष करणे सुरू केले आहे असे त्यांनी म्हटले आहे. नायजेरियाच्या उत्तरपूर्वेकडील भागात हा हल्ला झाला. तेथे बोको हरामचे मोठे प्राबल्य आहे. दरम्यान या हेलिकॉप्टर हल्ल्याची अजून कोणत्याच संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.