जम्मू काश्‍मीरमध्ये दोन चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा 

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमध्ये गुरुवारी झालेल्या दोन चकमकींमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शोपियन आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये या चकमकी झाल्या असे पोलिसांनी सांगितले. शोपियन जिल्ह्यातील यावरान जंगलामध्ये दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर तेथे दहशतवाद विरोधी कारवाई सुरू झाली होती. तेथे झालेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवादी ठार झाले. सज्जाद खांडे, अकिब अहमद दर आणि बशरात अहमद मीर अशी या तिघांची नावे असून हे सर्व पुलवामाचे रहिवासी होते, असे पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही संघटनांशी संबंधित गटात हे सक्रिय होते. दहशतवादी कारवाया, सुरक्षा रक्षकांवरील हल्ले आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या कारवायांमुळे ते तिघेही वॉन्टेड होते. त्यांच्याकडून 3 एके रायफली जप्त करण्यात आल्या. कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथे झालेल्या आणखी एका चकमकीमध्ये एक अनोळखी दहशतवादी ठार झाला. त्याच्याजवळूनही काही शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे, असे प्रवक्‍त्याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)