मुंबई – बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक ‘बिग बॉस ओटीटी’ची वाट पाहत होते. गेल्या वर्षी सुरू झालेला हा शो चांगलाच लोकप्रिय झाला होता. आता हा शो पुन्हा येत आहे. 17 जून पासून हा शो ओटीटीवर सुरु होणार आहे. या शोमध्ये अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी चित्रपटात झळकलेले अभिनेत्री देखील सामील होणार आहे.
ओटीटीवरील बिग बॉसचा हा दुसरा सीजन आहे. जो सलमान खान होस्ट करणार आहे. त्यामुळे या शोमध्ये कोण कोण सेलिब्रेटी असणार याची उत्सुकता लागली आहे. अशात रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री ‘जिया शंकर’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणार असल्याचे समजते. जिया ने मराठीसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील चित्रपट केले आहेत.
वेड चित्रपटात रितेश देशमुखसोबत जियाने ‘निशा’ हे पात्र साकारले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. आता जिया पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टसाठी सक्रिय झाली आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये सामील होऊन ती आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा हिस्सा होण्यासाठी तयार असल्याचे समजते.
पहिल्या सीझनच्या विजेत्या दिव्या अग्रवाललाही या शोने खूप प्रसिद्धी दिली. त्याचबरोबर या शोचा दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी हा शो अधिक खास आहे कारण यंदाचा ओटीटी सीजन करण जोहर ऐवजी सलमान खान होस्ट करणार आहे.