रांची – महिला दिनाची संधी साधून महिला कर्मचाऱ्यांना एक रेल्वे गाडी चालवण्याची संधी झारखंड मध्ये देण्यात आली.या महिला कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रांची-तोरी पॅसेंजर ट्रेन चालवली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.होळीच्या सणाच्या निमित्ताने आणि त्याला जोडूनच महिला दिन असल्याने, शुक्रवारी सर्व महिला-कर्मचाऱ्यांनी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
रांची रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी निशांत कुमार यांनी पीटीआयला सांगितले, की, हा कार्यक्रम महिलांना समर्पित होता. एका महिला अधिकाऱ्याने ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि सर्व महिला कर्मचाऱ्यांनी ट्रेन चालवली.” सकाळी 8.55 वाजता रांची रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. महिला संपुर्ण रेल्वे गाडीचे ऑपरेशन व्यवस्थीतपणे मॅनेज करू शकतात असे यातून सिद्ध झाल्याचे निशांतकुमार यांनी सांगितले.
महिला टीममध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, पाच तिकीट कलेक्टर आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या सहा सदस्यांचा समावेश होता.लोको पायलट दिपाली अमृत म्हणाल्या, “आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही आमचे दिवसभराचे कार्य पार पाडले. आज रेल्वेच्या प्रत्येक महत्त्वाच्या विभागात महिला कार्यरत आहेत.