Jharkhand Assembly Election 2024 Polling News: झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. येथे विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील 43 जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार सायंकाळी 5 वाजता अधिकृतपणे मतदान संपले. मात्र, अनेक बूथवर सायंकाळी पाचनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान सुरू राहिले.
आयोगाच्या नियमांनुसार, ज्या बूथवर सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी मतदारांनी रांगा लावल्या होत्या, तेथेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. दरम्यान, मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात 64.86 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला दोन्ही टप्प्यातील मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत.
#JharkhandAssemblyElection2024 | Jharkhand (Phase-1) recorded 64.86% voter turnout till 5 pm, as per the Election Commission of India. pic.twitter.com/dcJwRE5njl
— ANI (@ANI) November 13, 2024
#WATCH | Jharkhand: At the end of the first phase of polling for the assembly elections, EVMs are being sealed at a polling booth in Ranchi pic.twitter.com/ULqtVkGsdO
— ANI (@ANI) November 13, 2024