रांची : झारखंडचे मुख्य सचिव डीके तिवारी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) हेमंत सोरेन यांची गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तिवारी यांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
विधानसभा निवडणुकीत झामुमो, कॉंग्रेस आणि आरजेडी आघाडीला 47 जागा मिळाल्या आहे. युतीला झाविमोच्या तीन आमदारांचे बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
याशिवाय भाकपचे एकमेव आमदार विनोद सिंग यांनीही या युतीला पाठिंबा दर्शविला आहे. 81 सदस्यीय विधानसभेत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला 52 आमदारांचा भक्कम पाठिंबा आहे.