आजीच्या डोक्‍यात फरशी घालून नातीने लुटले दागिने

पिंपरी – नातीनेच वृद्ध आजीच्या डोक्‍यावर व तोंडावर फरशी मारुन दागिने लुटल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे. डोक्‍यात व तोंडावर फरशी मारल्याने 85 वर्षांची वृद्ध आजी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवार दि. 2 मे रोजी पिंपरी येथील संतबाबा मुलसिंग दरबार शनिमंदीरासमोर घडली.

याप्रकरणी कनवार सुंदरदास ठकुराणी (वय-41) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आजीला जखमी करणाऱ्या रेश्‍मा विकास रोकडे (वय-27 रा. सिमरन अपार्टमेंट, काळेवाडी) हिला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून तिच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कनवर यांच्या आई अमृताबाई सुंदर दास ठाकूराणी (वय 85) या घरात एकट्या होत्या. त्यावेळी कनवर यांच्या भावाची मुलगी रेश्‍मा देखील घरी होती. दरम्यान आरोपी रेश्‍मा हिने फरशीच्या तुकड्याने आजी अमृताबाई यांच्या तोंडावर व डोक्‍यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर, रेश्‍मा हिने आजीच्या अंगावरील सोन्याच्या दोन बांगड्या, एक सोन्याची चेन, कानातील सोन्याच्या रिंगा असे एकूण अडीच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेला. एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळालेल्या रेश्‍माला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.