नवी दिल्ली: जेट एअरवेज कंपनीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. लिजची रक्कम न दिल्यामुळे या कंपनीची आणखी पंधरा विमाने थांबविण्यात आली आहेत. या घडामोडीचा कंपनीच्या शेअरवर बुधवारी परिणाम झाला.
कंपनीने शेअरबाजाराला कळविले की, आता कंपनीचे फक्त वीस विमाने कार्यरत आहेत. काही महिन्यापूर्वी कंपनीचे 123 विमाने देशात आणि परदेशात सेवा देत होती.
या घडामोडीनंतर या विमान कंपनीने आपल्या वैमानिकांना बिनपगारी रजा देऊ केली आहे. वैमानिकांनी याअगोदरच पगार न मिळाल्यामुळे संपाचा इशारा दिला होता. मात्र वैमानिकांनी या विमान कंपनीला 14 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान या कंपनीच्या वैमानिकाच्या संघटनेने नागरी विमान वाहतूक संचालनालयाला पत्र पाठवून तीन महिन्याच्या पगाराची व्याजासह मागणी केली आहे. या घडामोडीचा आज जेट एअरवेज या कंपनीच्या शेअरच्या भावावर परिणाम होऊन शेअर 5 टक्क्यांनी कोसळले.