नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या “जेट एअरवेज’ या विमानकंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुमारे तीन महिन्यांपासूनचे पगार थकीत आहे. त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आज दिल्लीतील विमानतळावर याविरोधात निदर्शने केली आहेत.
Delhi: Employees of Jet Airways, including pilots, flight attendants & ground staff, demonstrate at Delhi Airport against Jet Airways' Management over non-payment of their salaries. pic.twitter.com/njFf3M0v6q
— ANI (@ANI) April 13, 2019
गेल्या काही महिन्यांपासून “जेट एअरवेज’ ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. याचा परिणाम अनेक उड्डाणांवर होत आहे. त्याचबरोबरीने या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचे सुमारे तीन महिन्यांपासूनचे वेतन देखील थकीत आहे. यापूर्वी पुरवठादार,विमानांचे भाडे आणि वैमानिकांना वेळेवर पैसे देऊ शकत नसल्यामुळे यापैकी काहींनी एअरलाइन बरोबरील करार संपुष्टात आणला होता.