नवी दिल्ली – जेट एअरवेजकडे एचडीएफसीचे 245 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र, या कर्जाच्या परतफेडीचा उशीर होत असल्यामुळे एचडीएफसीने कर्जवसुलीसाठी तिच्याकडे गहाण ठेवलेले जेट एअरवेजचे कार्यालय विक्रीला काढले आहे.
एचडीएफसीने म्हटले आहे की, जेट एअरवेज 414 कोटी रुपयांची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे आम्हाला गहाण ठेवलेली जागा विक्रीला काढावी लागत आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 52,775 वर्ग फुटाची ही जागा आहे असे सांगण्यात आले. या जागेसाठीची राखीव किंमत 245 कोटी रुपये ठेवण्यात आलेली आहे व याबाबतच्या बोली 15 मेपासून चालू होणार असल्याचे सांगितले जाते. जेट एअरवेजचे कामकाज मर्यादित कालावधीसाठी थांबविण्यात आलेले आहे. या कंपनीच्या विक्रीसाठी बोलीची प्रक्रिया कर्जदार बॅंकांनी सुरू ठेवलेली आहे.