जेट एअरवेजच्या शेअर मध्ये सुधारणा

मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. कंपन्यांचे ताळेबंद संमिश्र स्वरूपात जाहीर होत आहेत. त्याचबरोबर भारतात निवडणुका चालू आहेत. असे असतानाच अमेरिकेने इराणवरील निर्बंध अधिक कडक केल्यामुळे भारतीय शेअरबाजारात विक्रीचे वारे होते. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली.

तर दुसरीकडे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे शेअर बाजारातील मूल्य वेगाने कमी जास्त होत आहे.गेल्या तीन दिवसापासून या कंपनीच्या शेअरचे भाव 40 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले होते. मात्र मंगळवारी त्या कंपनीच्या शेअर चा भाव दहा टक्‍क्‍यांनी वाढला असल्याचे दिसून आले. कंपनीवर 8 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज असून कंपनीच्या 23 हजार कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.